जीवघेण्या ‘इबोला’वर औषध सापडलं ?

August 12, 2014 5:10 PM0 commentsViews: 15976

ebola_usa12 ऑगस्ट : जगभरात सध्या इबोला व्हायरसची भीती पसरलीय. यावर लस उपलब्ध नसल्यामुळे या जीवघेण्या विषाणूमुळे अनेक देशांना चांगलाच घाम फुटला आहे. मात्र आता यावर इलाज सापडल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे.

इबोलावरचं प्रायोगिक औषध लायबेरियन सरकारनं इबोलापीडित भागांमध्ये पाठवलंय. अमेरिकेत हे औषध विकसित करण्यात आलंय. हे औषध जेव्हा दोन अमेरिकन रुग्णांना दिलं, तेव्हापासून त्यांच्या परिस्थितीत सुधार झालाय असं समजतंय.

आतापर्यंत इबोलामुळे 1000 पेक्षाही जास्त लोकांचा मृत्यू झालाय. दक्षिण आफ्रिका, गिनी, नायजेरीया या देशात इबोलाने थैमान घातले आहे. औषध नसल्यामुळे हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा हाकनाक बळी गेलाय. भारतातही आरोग्य खात्याने अलर्ट जारी केला असून योग्य त्या खबरदारी घेतल्या जात आहे.

इबोला काय आहे ?

 • - जनावरांमार्फत माणसांना इबोलाचा संसर्ग होतो
 • - जनावरांचं रक्त, मांस, मलमूत्र इ.चा माणसाशी संपर्क आला तर इबोलाच्या संसर्गाची शक्यता वाढते
 • - तसंच ज्या व्यक्तीचा इबोलानं मृत्यू झालाय त्याच्या रक्ताशी संपर्क आल्यास इबोलाचा संसर्ग होतो

लक्षणं

 • - ताप, नाका-तोंडातून रक्त येणं
 • - लगेचच स्कीन इन्फेक्शन होणं
 • - अंगावर पुरळ येणं
 • - डोळे येणं, तोंड येणं
 • - जननेंदि्रयांवर सूज येणं

काय काळजी घ्यावी ?

 • - प्राथमिक स्वच्छता बाळगणं अत्यंत आवश्यक आहे
 • - विशेष करुन मांसाहारी लोकांनी स्वच्छता बाळगणं आवश्यक आहे
 • - स्वच्छ ठिकाणांहून मांस खरेदी करावं
 • - मांस नीट शिजवावं
 • - दुखापत झालेल्या प्राण्यांचं मांस खाऊ नये
 • - स्वच्छ पाणी प्यावं
 • - बाहेरील खाद्यपदार्थ टाळावे
 • - जेवणा आधी हात साबणाने स्वच्छ धुवावे
 • - केर-कचर्‍याची व्यवस्थित विल्हेवाट लावा.
 • - कुरतडणारे प्राणी हा विषाणु पसरवू शकतात

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close