पुणे मेट्रोचं लवकरच भूमिपूजन -मुख्यमंत्री

August 12, 2014 6:21 PM0 commentsViews: 605

cm pruthviraj chavan12 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने घोषणा आणि उद्घाटनाचा धडाका लावलाय. पुणे मेट्रो लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.

त्याचं लवकरात लवकर भूमिपूजन व्हावं अशा आशयाचं पत्र आपण केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना पाठवल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

पुण्यातल्या मंगळवार पेठेत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी करण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

विशेष म्हणजे या कार्यक्रमात लोकसभा निवडणुकीतच्या पराभवानंतर पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे आणि सुरेश कलमाडी एका व्यासपीठावर हजर होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close