‘इबोला’ग्रस्त नायजेरियात 3 भारतीय डॉक्टर अडकले

August 12, 2014 6:43 PM0 commentsViews: 5593

ebola virus nigeria_india doc12 ऑगस्ट : इबोला व्हायरसमुळे अनेक देशांना धडकी भरली आहे. प्रत्येक राष्ट्र या व्हायरसशी कसा सामना करता येईल यासाठी प्रयत्न करत आहे पण इबोलाच्या विळख्यात सापडलेल्या नायजेरियामध्ये 5 भारतीय डॉक्टर्स अडकले आहे.

इथं इबोला व्हायरस खूप पसरलाय. आमच्या डोळ्यादेखत आम्ही अनेकांचा मृत्यू इथं पाहिला आहे. आमच्या जीवाला धोका असून आम्हाला वाचवा अशी मदतीची हाक या डॉक्टरांनी दिली आहे.

पण या भारतीय डॉक्टर्सना मायदेशी पाठवण्यास ते हॉस्पिटल तयार नाही. अबुजामधील या हॉस्पिटलनं या डॉक्टरांना बळजबरीनं ठेवल्याचं या डॉक्टरांचं म्हणणं आहे. सीएनएन आयबीएनच्या हाती या डॉक्टर्सपैकी 3 डॉक्टरांचा एक व्हिडिओ लागला आहे. या व्हिडिओमध्ये हे डॉक्टर्स मायदेशी परतण्याची विनवणी करत असल्याचं दिसतंय.

आता या व्हिडिओची दखल भारत सरकारनं घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या डॉक्टरांना परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय. तर अबुजामधील त्या हॉस्पिटलनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. सध्या इबोला व्हायरसच्या भीतीमुळे अनेक जण नायजेरीया सोडून मायदेशी परतत आहेत. इबोलामुळे जगभरात जवळपास 1000 जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close