पुन्हा ‘लाडू’ कडू?, महालक्ष्मीच्या प्रसाद केंद्रावर छापा

August 12, 2014 10:57 PM0 commentsViews: 1823

12 ऑगस्ट : कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या प्रसादाचा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. मंदिरामध्ये भाविकांना बुंदीच्या लाडूचा प्रसाद दिला जातो. सुवासिनी महिला बचत गटाकडे या प्रसादाचं कंत्राट देण्यात आलंय. पण लाडूच्या पाकिटांवर उत्पादनाची तारीख नसल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने या प्रसाद केंद्रावर छापा टाकून तिथलं साहित्य ताब्यात घेतलंय.

तसंच या लाडू केंद्रावरच्या तेलाचे आणि डाळीच्या पिठाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याच्या तपासणीनंतर कारवाई करणार असल्याचं प्रशासनानं सांगितलंय. ना नफा ना तोटा या तत्वावर देवस्थान समितीकडून प्रसादाचं कंत्राट हे महिला बचत गटांना दिलं जातं.

त्यानुसार सुवासिनी बचत गटाकडे हा ठेका आहे. त्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. तर निविदेप्रमाणेच प्रसादाचं वाटप सुरू असल्याचं देवस्थान समितीनं स्पष्ट केलंय. यापूर्वीही महिलांना मासिक पाळी येत असल्याने महिला बचत गटांना प्रसाद तयार करण्याचे कंत्राट देऊ नये यावरुनही एकदा वाद निर्माण झााला होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close