यंदा ‘खेलरत्न’ पुरस्कार नाही !

August 12, 2014 11:09 PM0 commentsViews: 306

khelratna12 ऑगस्ट : एकीकडे देशाचा सर्वोच्च भारतरत्न सन्मानावरून चर्चा सुरू असताना यंदा खेलरत्न पुरस्कार कुणालाही दिला जाणार नाही हे निश्चित झालं आहे. राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार असं या पुरस्काराचं पूर्ण नाव आहे. सरकारतर्फे दिला जाणारा देशातला हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे.

तो देण्यास सुरूवात झाली, तेव्हापासून यंदा प्रथमच हा पुरस्कार कुणालाही दिला जाणार नाहीये. विकास गौडा, कृष्णा पुनिया, सोमदेव देववर्मन, जीव मिल्खा सिंग, पीव्ही सिंधु आणि देवेंद्र झाझरिया यांची नावं पुरस्कारासाठी विचारात होती. त्यासाठी माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close