मायावतींशी युती करायला तयार – मुलायमसिंह यादव

August 13, 2014 1:45 PM0 commentsViews: 1113

mayavati and mulayansingh

13   ऑगस्ट : लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनीही भाजपला रोखण्यासाठी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्याशी हात मिळविण्याची तयारी दर्शविली आहे.

बिहारमधील हाजीपूर इथे काल झालेल्या सभेत लालूप्रसाद यांनी मुलायमसिंह यादव आणि मायावती यांनाही एकत्र येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनावर बोलताना मुलायमसिंह म्हणाले, की लालूप्रसाद यांनी मध्यस्थाची भूमिका पार पाडली, तर मी बहुजन समाज पक्षाबरोबर आघाडी करण्यास तयार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close