हवाहवाई @ 51!

August 13, 2014 2:09 PM0 commentsViews: 1396

13  ऑगस्ट :   ‘सदमा’ या सिनेमात स्मृतिभ्रंश झालेल्या तरुणीची भूमिका असो, किंवा ‘मिस्टर इंडिया’ या सिनेमात ‘हवाहवाई…’ किंवा ‘काटे नाही कटते…’ गाण्यावर थिरकून प्रेक्षकांना भुरळ घालणार्‍या श्रीदेवीने आज आपल्या वयाची पन्नाशी पार केली. सिल्व्हर स्क्रिनवर साकारलेल्या आपल्या प्रत्येक भूमिकेने तिने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. श्रीदेवी केवळ दिसायलाच सुंदर नाही तर तिचा फॅशन सेन्ससुद्धा जबरदस्त आहे. कोणता लेटेस्ट ट्रेंड सुरू आहे आणि कोणती फॅशन आपल्याला सूट होईल, हे श्रीदेवीला चांगलेच कळते, मग इंडियन स्टाईल असो किंवा वेस्टर्न, श्रीदेवीचा अंदाज आजच्या तरुण अभिनेत्रींपेक्षा वेगळा आणि जबरदस्त असतो यात काहीच शंका नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close