अखेर मुंबई इंडियन्स जिंकली : बंगलोर रॉयल चॅलेंजर्सचा 16 रन्सनी पराभव

May 11, 2009 11:56 AM0 commentsViews: 2

11 मे,रविवारी झालेल्या मुंबई आणि बंगलोर या मॅचमध्ये मुंबईनं बंगलोरचा 16 रन्सनी पराभव केलाय. या विजयाने आयपीएलच्या पहिल्या राऊंडमधल्या पराभवाचा वचपा मुंबईनं काढला. मुंबईने दोन बाद 157 रन्स करुन बंगलोरला सात बाद 141 रन्सवरच रोखलं. बंगलोरचा युवा बॉलर विनय कुमारने सचिन तेंडुलकरला झटपट आऊट केलं. जयसूर्याने व्हॅन देअर मर्व्हच्या बॉलवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. पण अजिंक्य रहाणे आणि जीन पॉल ड्युमिनी या नौजवान बॅट्समननी स्वत:ची हाफ सेंच्युरी पूर्ण करत टीमला 157 रन्सचा टप्पा गाठून दिला. बंगलोरची टीम सुरुवातीपासूनच ढेपाळली. जॅक कॅलिस आणि रॉबिन उथप्पा, विराट कोहली, द्रविड आणि टेलर पाठोपाठ आऊट झाले. अखेर मुंबईचं आव्हान परतवायला त्यांना 16 रन्स कमी पडले. पराभवाबरोबरच बंगलोरच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा अंधुक झाल्यात. याउलट मुंबईने सलग तीन पराभवांची मालिका खंडीत केली आहे. अखेर ही मॅच जिंकून मुंबई इंडियन्सना दिशा सापडली आहे.

close