…हे गावही ‘माळीण’च्या वाटेवर !

August 13, 2014 4:17 PM0 commentsViews: 192

आसिफ मुरसल, सांगली

13 ऑगस्ट : सांगली जिल्ह्यातील ताकारी गावावर कधीही डोंगरांचे कडे, कपारी, दगड कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे इथले नागरिक भीतीच्या वातावरणात राहत आहेत. गावकर्‍यांनी यासंदर्भात लेखी निवेदन देऊनही कोणतेच उपाय होत नाहीयेत.

सांगली जिल्ह्यातलं सागरेश्वर अभयारण्य मानव निर्मित आहे. इथंच सागरेश्वर डोंगर आहे. त्याच्या पायथ्याशी 10 हजार लोकसंख्येचं ताकारी गाव वसलंय. डोंगरावरचे मोठे दगड कधीही पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे नागरिक चिंतेत आहेत. इथं 150 वर्षांपूर्वीचं कमळ भैरव मंदिर आहे. मंदिराजवळच्या डोंगराला भेगा पडल्यात. इथं मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.

डोंगराजवळ गावकर्‍यांची 88 हेक्टर जमीन आहे. ती जमीन सध्या वनविभागाच्या ताब्यात आहे. तिथल्या कपारी हटवण्यास वनविभागाने मनाई केलीये. या कपारी हटवण्यासाठी गावकर्‍यांनी राजकीय नेत्यांना अनेकवेळा निवेदनही दिलंय. पण त्याचा उपयोग झालेला नाही. उशीर होण्याआधीच त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close