नॅनो ‘शुभ गृह’ हाऊसिंग प्रकल्प सुरू

May 11, 2009 12:18 PM0 commentsViews: 6

11 मे, नॅनो कार्सनंतर आता टाटा घेऊन आले आहेत नॅनो घरं. आजपासून टाटांच्या महत्वाकांक्षी 'शुभ गृह' या नॅनो हाऊसिंग प्रकल्पाच्या बुकिंगची सुरूवात झाली आहे. नॅनो कारप्रमाणेच या घरांच्या नोंदणीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखांमध्ये फॉर्म्स सहज उपलब्ध आहेत. पहिल्या टप्प्यात बाराशे घरांसाठी जे बुकिंग होणार आहे. त्याचे शुल्क दहा हजार रुपये आहे. लॉटरी सिस्टमनं या फ्लॅट्ससाठीची अलॉटमेंट होणार आहे. टाटांची ही स्वस्त घरं मुंबईतल्या विरार उपनगरापासून पन्नास किलोमीटर दूर असणार्‍या बोईसर इथे बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पात अंदाजे चार लाख ते पावणे सहा लाखांच्या किमतीचे फ्लॅट्स देण्यात येतील. मुंबईनंतर दिल्ली एनसीआर, बंगळुरूमध्येही असेच शुभ गृह प्रकल्प सुरू करण्याची टाटांची योजना आहे. सध्या या योजनेत वन रुम किचन 283 स्क्वेअर फुट आणि 360 स्क्वेअर फुट मध्ये मिळेल तर वन बीएचकेचं घर 465 स्क्वेअर फुटांचं असेल. तसंच या टाऊनशिपमध्ये सर्व प्रकारच्या सुविधाही उपलब्ध असतील.

close