पोटनिवडणुकीचा तिढा, आघाडीच्या जोर ‘बैठका’

August 13, 2014 4:42 PM0 commentsViews: 754

35pawar_cm_ncp13 ऑगस्ट : विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज (बुधवारी) राष्ट्रवादीची महत्वाची बैठक होतेय.

पक्षाध्यक्ष शरद पवारांनी ही बैठक बोलावलीय, या बैठकीत काय निर्णय होतो त्यावर पुढची समिकरणं ठरणार आहे. तर राष्ट्रवादीच्या बैठकीआधी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची महत्वाची बैठक बोलावलीय.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी उमेदवारीवर ठाम आहेत. राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे तर काँग्रेसकडून मोहन जोशी उमेदवार आहेत.

काँग्रेसकडे जास्त मतं असल्यानं ही जागा काँग्रेससाठी सोडावी असा आग्रह काँग्रेसचा आहे. तर राष्ट्रवादीने तटकरेंसारखा ‘हेवीवेट’ नेत्याला उमेदवारी दिल्यानं दोन्ही पक्षांच्या तणावात आणखीच भर पडलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close