निराधारांना नाही आधार, उतारवयात भीक मागण्याची वेळ !

August 13, 2014 5:17 PM0 commentsViews: 533

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद

13 ऑगस्ट : राज्यसरकारच्या लोककल्याणाच्या जाहिराती सध्या सगळीकडे झळकत आहे. पण वास्तव वेगळंच आहे. अनेक निराधार वृद्ध महिलांचा पगार सरकाराने दिलेला नाही. सरकार एकीकडे जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च करत असताना दुसरीकडे या निराधार वृद्धांवर भीकेसाठी हात पसरण्याची वेळ आलीय.

लक्ष्मीबाई या गेल्या अनेक दिवस आधार कार्यालयात खेटे घालत आहेत. त्यांच्या निराधार पगारासाठी.. गेल्या 2 वर्षांपासून त्यांचा पगार मिळालेला नाही. भीक मागून त्या दिवस काढत आहेत. पगाराचं विचारलं म्हणून त्यांना हुसकवून लावण्यात आलं. त्यांच्यासोबत आम्ही कार्यालयात गेलो.

एका डोळ्यानं दिसत नसलेल्या भागाबाईची कथा वेगळी नाही. त्यांनाही गेल्या अनेक दिवसांपासून हक्काचा पगार मिळालेला नाही. आज आपला पगार मिळेल या आशेवर त्या रोज चार किलोमिटर पायी चालत आधार कार्यालयात येतात. आपली व्यथा सांगताना त्यांना हुंदके आवरत नाहीत.

निराधार मंडळाचे अध्यक्ष तकी हसन मात्र यासगळ्याचं खापर मात्र या म्हातार्‍यांवरच फोडत आहेत. त्यांनी दिलेलं युआयडी, इलेक्शन कार्ड बोगस असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

आधार कार्यालयाने या निराधारांना बोगस ठरवत आपली जबाबदारी झटकून टाकलीय. स्वता:चं कुणी जवळच नाही आणि शासनही हक्काचं वेतन देत नाही त्यामुळे निराधारांवर उपासमारीची वेळ आलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close