स्वातंत्र्यदिनाची भेट, पेट्रोल 2 रूपयांनी स्वस्त होणार

August 13, 2014 8:00 PM0 commentsViews: 450

Petrol13 ऑगस्ट : महागाईला कंटाळलेल्या सर्वसामान्य जनतेला स्वातंत्र्यदिनाची खास भेट मिळणार आहे. 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पेट्रोलचे दर जवळपास 2 रुपयांनी कमी केले जातील, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट करून दिली आहे.

2010मध्ये तत्कालीन यूपीए सरकारनं पेट्रोलचे दर नियंत्रणमुक्त केले होते. त्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या मंत्र्यानं पेट्रोलचे दर कमी करत असल्याचे जाहीर केलंय.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन या देशातल्या सर्वात मोठ्या तेल कंपनीनं मंगळवारीच पेट्रोल दरकपातीचे संकेत दिले होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कमी होत असल्यामुळे भारतीयांना दिलासा मिळतोय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close