नाराजीनाट्य ‘इम्पॅक्ट’, प्रचाराची धुरा राणेंकडे

August 13, 2014 9:47 PM0 commentsViews: 1386

naryan rane on nitish twit13 ऑगस्ट : काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी नाराजीनाट्याचा प्रयोग करुन राज्याच्या राजकारणात धुराळं उडवून दिली होती पण नेहमीप्रमाणे माघार घेऊन आपलीच फजिती करुन घेतली. पण राणेंना या नाट्याचं आता फळ मिळालंय.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने समिती स्थापन केली असून निवडणुकीचं प्रचार समितीचं प्रमुखपद राणेंकडे सोपवण्यात आलं आहे. तर जाहीरनामा समितीची जबाबदारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

त्याशिवाय माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यावरही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीये. ते समन्वय समितीचे प्रमुख असणार आहे.

विशेष म्हणजे काँग्रेसने विधानसभेची रणनीती आखत माजी मुख्यमंत्र्यांकडे प्रचाराची धुरा सोपवली आहे. एकीकडे भाजप आणि शिवसेनेनं लोकसभेत घवघवीत यश मिळवल्यामुळे विधानसभा आपणच जिंकणार असा विश्वास युतीचे नेते व्यक्त करत आहे. लोकसभेत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे विधानसभेत युतीच्या नेत्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने आता नारायण राणे यांना पुढे केलं आहे. शिवसेना आणि राणे यांचा वाद सर्वश्रूत्र आहे. त्यामुळे प्रचारात काँग्रेस विरुद्ध शिवसेना ऐवजी राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार हे स्पष्ट आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close