आमिर म्हणतो, पी.केच्या दुसर्‍या पोस्टरमध्ये ट्रान्झिस्टर सुद्धा नाही !

August 13, 2014 9:21 PM1 commentViews: 4514

13 ऑगस्ट : मि.परफेक्टनिस्ट आमिर खानचा आगामी सिनेमा पी.के. च्या अर्धनग्न पोस्टरवरुन चांगलाच वाद रंगलाय. पण आता येत्या 20 तारखेला पीकेचं दुसरं पोस्टर प्रसिद्ध होणार आहे आणि या पोस्टरमध्ये मी ट्रान्झिस्टर सुद्धा हातात घेतलेला नाही असं खुद्द आमिर खानने सांगितलंय. मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या माय मराठी या उपक्रमाचं उद्घाटन अभिनेता आमिर खानच्या हस्ते झालं. आमिरनं या उपक्रमासाठी 25 लाखांची मदत केलीय. यावेळी त्यांनी सरकारनं आणि मराठी विभागानं या उपक्रमाला मदत न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं.

यावेळी मीडियाशी आमिरने संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी आमिरला पीके पोस्टरबद्दल विचारलं. यावर आमिर म्हणाला, हा वाद का होत आहे मला कळत नाही. पण पीकेचं दुसरं पोस्टर 20 ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे आणि त्या पोस्टरमध्ये मी ट्रान्झिस्टर सुद्धा हातात घेतलेला नाही, आता बोला असा टोलाच आमिरने खास आपल्या ‘मराठी स्टाईल’ लगावला. तसंच मला मराठी चित्रपट करायचा आहे पण हवं तशी स्क्रिप्ट मिळाली नाही असंही आमिर म्हणाला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Jayesh Shertate`

    must be good humor behind that poster…

close