धोनीला पद्मभूषण तर विराट कोहलीच्या नावाची पद्मश्रीसाठी शिफारस

August 14, 2014 10:05 AM0 commentsViews: 685

MS-Dhoni-Virat-Kohli

14 ऑगस्ट :  इंग्लंड दौर्‍यावर असलेल्या टीम इंडियाला पराभवाचे दणके बसत असले आणि त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत असला, तरी कॅप्टन धोनी आणि कोहलीसाठी एक खुशखबर आहे. टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीची पद्मभूषण पुरस्कारासाठी, तर व्हाईस कॅप्टन विराट कोहली आणि भारताच्या महिला टीमची कॅप्टन मिताली राजचीही पद्मश्रीसाठी शिफारस करण्यात आली आहे. बीसीसीआयने या तिघांच्या नावाची क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस केली आहे. धोनीला 2009 साली पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतानं दोन विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला आहे. तर विराट कोहलीनं अनेक सामन्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. जर धोनीला पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं तर हा मान मिळवणारा तो दहावा क्रिकेटर ठरेलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close