पंतप्रधानपदी मनमोहन सिंग नको : डाव्यांचा विरोध

May 11, 2009 4:24 PM0 commentsViews: 2

11 मे निवडणूक निकालांनंतर युपीएला सर्वात जास्त जागा मिळाल्या आणि आकडा सरकार स्थापनेसाठी पुरेसा नसला तर युपीएला मदत करण्याचे संकेत डाव्यांनी दिले आहेत. पण पंतप्रधानपदी मनमोहन नसतील अशी अट डाव्यांनी घातल्याची माहिती सीएनएन आयबीएनला मिळाली आहे. निवडणुकीनंतरच्या राजकीय समीकरणांना आतापासूनच वेग आला आहे. तत्पूर्वी डाव्यांनी तिसर्‍या आघाडीच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न करू असा निर्धारही व्यक्त केला. दरम्यान, बुद्धदेव भट्टाचार्य यांनी सगळे पर्याय खुले असल्याचं सांगून या गोंधळात आणखी भर घातली आहे. पण कुणाशी आघाडी करायची याचा निर्णय निवडणूक निकालानंतरच घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

close