11/7 : सादिक शेखची पुराव्याअभावी सुटका

May 11, 2009 4:36 PM0 commentsViews: 3

11 मे, मुंबई 11 जुलै 2006 रोजी मुंबईत लोकल गाड्यांमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणणारा आरोपी सादिक शेख याची आज पुराव्या अभावी सुटका करण्यात आली. सादिक विरोधात कोणताही पुरावा न मिळल्याची कागदपत्र जेव्हा दहशतवाद विरोधी पथकाने विशेष मोक्का न्यायालयात सादर केली तेव्हाच त्याची मोक्का न्यायालयाने पुराव्या अभावी सुटका केली. सादिक शेख हा इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक असल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. त्यामुळे मुंबई क्राईम ब्रान्च त्यासंबंधी कसून शोध घेत होती. नंतर हे प्रकरण दहशतवाद विरोधी पथकाकडे (ऍन्टी टेररीस्ट स्क्वॉड-एटीएस) सोपवण्यात आलं होतं. त्यानंतर विशेष मोक्का न्यायालयात सादिक शेखविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात सादिक विरोधात कोणताही सबळ पुरावा सापडला नसल्याची कागदपत्रं एटीएसने विशेष मोक्का न्यायालयात सादर केली होती. तसंच 11/7च्या या स्फोटांशी सादीकचा काहीही संबंध नसल्याची कबुली एटीएसने दिली. त्यावेळी सादिकची सुटका करण्यात आली. तीन वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेवर सात ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांत 209 लोक मृत्यूमुखी पडले होते. तर 714 जण जखमी झाले.

close