लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण

August 15, 2014 8:21 AM2 commentsViews: 612

BvC5LPZCAAAfSL0

15 ऑगस्ट : 68 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीं आज लाल किल्ल्यावरून भाषण करत आहेत. ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचं हे पहिलंच भाषण आहे. दिल्लीमध्ये आज कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. लाल किल्ल्याच्या भोवती तब्बल 10 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. लाल किल्ल्यापासून 3 किलोमीटरच्या अंतरामध्ये कोणालाही प्रवेश करता येणार नाहीये आणि पहिल्यांदाच हा संपूर्ण भाग सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली येणार आहे. दरवर्षी पंतप्रधान भाषण वाचून दाखवण्याचा रिवाज पाळला जातो. पण यावेळी मोदी आपल्या भाषणाचे मुद्दे लिहून आणतील आणि स्वयंप्रेरणेनं भाषण करतील.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • vaidyashivram2

  1)
  नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंतच्या
  पंतप्रधानांच्या भाषणाच्या परंपरा मोडीत काढून, स्वत: बुलेट प्रूफ़ पडद्याआड उभे राहुन
  जनतेला निर्भयपणे जगण्याचा संदेश देण्याच्या इतिहासातील पंतप्रधानांच्या “धाडसा”ला
  तिलांजली देऊन, आपल्या उत्स्फुर्त भाषणाने अनेक जणांना आपल्या तोंडात बोटे घालायला
  लावले असेल. आत्तापर्यंत देशात आलेल्या सरकारांचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांनी या
  सरकारांच्या कामकाजाला सलाम केला आहे. देशाचा प्रधानसेवक असल्याची भावना व्यक्त करतानाच,
  बहुमताचे राजकारण न करता, त्यांनी सहमतीचे राजकारण करून विरोधकांना बरोबर घेऊन पूढे
  जाण्याचा मांडलेला नविन विचार सुद्धा विरोधी पक्षाच्या नेत्यांना विचार करायला लावणारा
  आहे. बलात्कार करणाऱ्या प्रवृतींचा धि:क्कार करतानाच त्यांनी आपल्या देशातील, महिला
  आणि पुरुष यांच्या संख्येतील फरकावर चिंता व्यक्त केली. आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी
  गर्भाची हत्या करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर टीका करतांना त्यांनी देशातील महिला/मुली आपल्या कुटुंबासाठी त्याग करतात
  हे सुद्धा सांगितले. योजना आयोगाचे “श्राद्ध” घालण्याचा ऐतिहासिक निर्णय
  जाहीर करतांना त्यांनी खासदारांना आदर्श गाव बनवण्याचा आदेश सुद्धा दिला आहे. गावागावात
  महिलांसाठी आणि सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी/विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र शौचालयांची
  आवश्यक्ता त्यांनी व्यक्त केली. आयातीवर नियंत्रण आणून निर्यातीवर भर देतांना त्यांनी
  “येथे बनवा आणि जगात विका” असा अतिशय मोलाचा संदेश सुद्धा दिला आहे. सार्वजनिक
  स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य यावर सल्ला देताना त्यांनी देशात धर्माच्या नावावर चाललेल्या
  राजकारणाला / हिंसाचाराला थांबवण्याचे आवाहन
  सुद्धा केले. “झिरो डिफेक्ट, नो इफेक्ट” या नवीन तंत्राबरोबरच, खांद्यावर
  अतिरेकी हल्ले करण्यासाठी बंदूक ठेवून देश देशाच्या जमिनीला निरपराध जनतेच्या रक्ताने
  लाल करण्याऐवजी, त्याच खांद्यावर नांगर घेऊन आपल्या देशाच्या धरतीला, आपल्या घामाने
  आणि श्रमांनी हिरवेगार करून टाकण्याचे ऐतिहासिक आवाहन त्यांनी केले. एकूणच मोदींनी
  आपल्या प्रधान सेवक म्हणून लाल किल्यावरून केलेल्या पहिल्याच भाषणात संपूर्ण देशालाच
  एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील जनतेने सुद्धा त्यांच्या आवाहनांना
  सकारात्मक प्रतिसाद देऊन जनता सुद्धा त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही
  दिली पाहिजे. असे झाले तर आपल्या देशाला जगाच्या नकाशात एक अभिमानास्पद ओळख मिळेल यात
  शंका नाही.

 • vaidyashivram2

  सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांनी
  २०१४ च्या स्वातंत्र्यदिनाला देशाचा पंतप्रधान (मोदींच्या भाषेत प्रधान सेवक) म्हणून
  देशाला संबोधित केले त्याबद्दल जनतेचे हार्दिक आभार आणि अभिनंदन ! याच साठी आम्ही जनतेने केला होता अट्टाहास, केला
  होता निश्चय, केला होता निर्धार, बाळगले होते हे स्वप्न उराशी ! ते स्वप्न आज सत्यात
  उतरले याचे अतीव समाधान आहे. “पारंपारिक” घराणेशाहीच्या सरकारांमधून, अपरिपक्व,
  भ्रष्ट, स्वार्थी, नेभळट, कणाहीन नेतृत्वाकडून, मेहनती, धाडसी, कष्टाळू, प्रामाणिक
  आणि देशहिताची कळकळ असलेल्या नेत्यांकडे देशाचा कारभार सोपवण्याचा जनतेचा निर्णय किती
  सार्थ होता याचे प्रत्यंतर मोदींच्या आजच्या भाषणामधून आज आले एवढे सांगितले की पूरेसे
  आहे.

close