पगारवाढीमुळे राज्यपोलिसांना दिलासा

May 12, 2009 7:33 AM0 commentsViews: 3

12 मे मुंबईसह राज्यातल्या दीड लाख पोलिसांचे पगार आता दुप्पट होणार आहेत. येत्या जूनपासून सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. 1 जून 2009 पासून ही पगारवाढ लागू होईल. सध्या पोलीस शिपाई ,पोलीस नाईक आणि हवालदार यांचा बेसिक पगार साडेतीन हजाराच्या आसपास आहे. त्यात आता वाढ होऊन तो दुप्पट होणार आहे. तर अधिकार्‍यांचा मूळ पगार 5500 आहे तो 3500 इतका वाढेल. पोलीस कर्मचार्‍यांसारखी त्यात दुप्पट वाढ होणार नाही. त्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. वास्तविक ही पगार वाढ 1 एप्रिल 2009 मध्ये करण्यात येणार होती. पण काही अडचणींमुळे सरकारनं हा निर्णय पुढे ढकलला होता. महाराष्ट्र पोलिसांवर कामाचा दबाव असताना पगाराबाबत मात्र जैसे थे स्थिती होती. त्यामुळे पोलिसांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. 6 व्या वेतन आयोगामुळे पोलिसांना हा दिलासा मिळाला आहे.

close