लातूरच्या आयटीआयमध्ये विद्यार्थ्यावर रॅगिंग

May 12, 2009 8:53 AM0 commentsViews: 4

12 मे, लातूरलातूर इथल्या सरकारी आयटीआय हॉस्टेलमध्ये रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. आयटीआयच्या पहिल्या वर्षाची पुन्हा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी हा प्रकार केला आहे. या विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याला विवस्त्र नाचायला भाग पाडून त्याला मारहाण केली. या संदर्भात शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत तिघांना अटक झाली असून दोघेजण फरार आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमणार असल्याचं प्राचार्यांनी सांगितलंय. तर याअगोदर कोणत्याही विद्यार्थ्यांनी रॅगिंगबाबत तक्रार केली नसल्याचा दावा प्राचार्यांनी केला आहे.

close