सलग सुट्‌ट्यांमुळे एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

August 15, 2014 2:07 PM0 commentsViews: 1956

lonavla
15 ऑगस्ट :  तुम्ही जर मुंबईहून पुण्याला जायचा विचार करत असल, तर थांबा…! पुन्हा विचार करा…! कारण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत तर लोणावळ्यातही वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. सलग 4 दिवस सुट्टीचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यात एक लाखाहून जास्त पर्यटक दाखल झाले आहेत. लोणावळ्यातल्या भुशी डॅमवरही खूप गर्दी झाली आहे. त्यामुळे आज दुपारी 3 नंतर भुशी डॅमकडे जाण्यार्‍या पर्यटकांना लोणावळा पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे तुम्हीही जर कुठे फिरायला जाण्याच्या विचारात असाल तर दुसर्‍या पर्यायाचा विचार नक्की करा.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close