अखेर बबनराव पाचपुतेंचा राष्ट्रवादीला रामराम

August 15, 2014 6:24 PM0 commentsViews: 5600

babanrao pachapute4415 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे बडे नेते बबनराव पाचपुते यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंद्यामध्ये समर्थकांचा मेळावा घेऊन पाचपुतेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.

पक्षाच्या विरोधात आपण बंड पुकारण्याचा कधी विचार केला नाही पण पक्षात आपल्याला एका बाजूला टाकलं गेलं. पिचड सारख्या ज्येष्ठ नेत्यांने शिवीगाळ केला. वरिष्ठ नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तर कुणी फोन उचलत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी उपेक्षितांची वागणूक मिळत असल्यामुळे आपण राष्ट्रवादी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असं सांगत पाचपुतेंनी जाहीर केलं.

तसंच लोकसभा निवडणुकीत मी भाजपचं काम केलं असा अपप्रचार केला गेला. मी असं कधीही वागलो नाही. उलट माझ्याविरोधात प्रचार केला गेला असा आरोपही पाचपुतेंनी केला. आज पक्षातून बाहेर जरी पडलो असलो तरी उद्या जर अपक्ष उभं राहायचं असेल तर अपक्ष उभे राहू असंही पाचपुतेंनी स्पष्ट केलं.

मात्र आजच्या या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी पाचपुतेंनी भाजपमध्ये प्रवेश घ्यावा असा आग्रह धरला. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच भाजपचे नेते विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे पाचपुते आता भाजपमध्ये प्रवेश घेतात का हे पाहण्याचं ठरेल.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close