विजय सावंतांच्या उमेदवारीला राणेंकडून ब्रेक ?

August 15, 2014 6:41 PM0 commentsViews: 4811

56rane_pc15 ऑगस्ट : नारायण राणे यांची काँग्रेसच्या प्रचारसमितीच्या प्रमुखपदी निवड होऊन दोन दिवस उलट नाही तेच त्यांच्याच कोकणात धुमशान सुरू झालंय.

विजय सावंत यांना सिंधुदुर्गातून काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही आणि अपक्ष राहिले तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला फुलस्टॉप मिळेल, असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलंय.

सावंत यांनी कणकवली मतदासंघातून उमेदवारी मागितली आहे. तर कणकवलीतून नितेश राणेही उमेदवारीसाठी उत्सुक आहेत. राणे यांनी सिंधुदुर्गात आज पत्रकार परिषद घेतली आणि सावंतांच्या उमेदवारीला ब्रेक लावला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close