बारा वर्ष, ‘सही रे सही ‘ !

August 15, 2014 6:51 PM0 commentsViews: 479

sahi re sahi15 ऑगस्ट : मदन सुखात्मे, रंगा ट्रक ड्रायव्हर, गलगले आणि दामू अशा या ‘फोर इन वन’ भरत जाधवच्या ‘सही रे सही’ नाटकाने 12 वर्ष पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच या नाटकाने 12 यशस्वी वर्ष पूर्ण केली आहे.

केदार शिंदे लिखित दिग्दर्शित ‘सही रे सही ‘ या नाटकाचा 15 ऑगस्ट 2002 ला पहिला प्रयोग झाला आणि त्यानंतर या नाटकाने आणि या नाटकातील प्रमुख भूमिका करणार्‍या भरत जाधवने मागे वळून पाहिलंच नाही. विक्रमाचे सगळे रेकॉर्डस मोडणार्‍या या नाटकाने मराठी रंगभूमीवर एक नवा इतिहास रचला.

आज 12 वर्षानंतरही या नाटकाला रसिकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळतोय हे विशेष. भरतने या नाटकात साकारलेल्या मदन सुखात्मे, रंगा ट्रक ड्रायव्हर , गलगले आणि दामू या 4 व्यक्तिरेखा घराघरात पोहचल्या. भरत जाधवला ‘सही रे सही’या नाटकामुळे प्रसिद्धीझोतात आला. सध्याच्या मराठी रंगभूमीवर इतकं यश आणि प्रेम मिळालेले एकमेव नाटक म्हणून ‘सही रे सही’चा उल्लेख करावा लागेल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close