19 मे ला म्हाडाची लॉटरी

May 12, 2009 1:46 PM0 commentsViews: 4

12 मे, म्हाडाच्या स्वस्त घर योजनेसाठी पात्र अर्जदारांची नावं आज जाहीर होणार आहेत. म्हाडाच्या www.mhada.com या वेबसाईटवर ही नावं पाहता येतील. घरांसाठी आलेल्या एकूण 4 लाख 303 अर्जांपैकी 5 हजार 300 जणांचे फॉर्म्स अपात्र ठरवण्यात आले आहेत. उर्वरित फॉर्म्समधून येत्या 19 मे रोजी लॉटरी सिस्टमने 3 हजार 863 अर्जदारांची निवड करण्यात येणार आहे. म्हाडाच्या या योजनेसाठी अर्जदारांनी 15 ते 35 हजार रूपयांची डिपॉझिटस् भरली आहेत. गेल्या फेब्रुवारी महिन्यात या स्वस्त गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले होते. या योजनेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

close