दारूबंदी झालीच पाहिजे, महिलांनी केलं चक्क मुंडन !

August 15, 2014 9:28 PM0 commentsViews: 3865

15 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्हयात संपूर्ण दारुबंदी करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ पारोमीता गोस्वामींच्या नेतृत्वात 31 महिलांनी सामूहिक मुंडन करुन सरकारचा निषेध व्यक्त केला. गेल्या तीन वर्षापासून चंद्रपूर जिल्हयात दारुबंदी करण्याच्या मागणीसाठी श्रमिक एल्गारच्या पारोमीता गोस्वामींच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यानी निवडणुकीनंतर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देऊनही कारवाई न झाल्याने पारोमीता गोस्वामींच्या नेतृत्वात एक हजार महिलानी चंद्रपूरचे पालकमंत्री संजय देवतळेंच्या वरोरा येथील घरासमोर आंदोलन करायची परवानगी न मिळाल्याने गांधी चौकात धरणे आंदोलन केलं. यानंतर 31 महिलानी पारोमीता गोस्वामींच्या नेतृत्वात सामूहिक मुंडन केलं. त्या मुंडना दरम्यान एकेक महिला पारोमीता गोस्वामींची गळाभेट घेऊन रडत होत्या दारुबंदी न करणार्‍या सरकारच्या विरोधात मतदान करण्याचे जाहीर करुन मुख्यमंत्री आणि चंद्रपुरचे पालकमंत्री संजय देवतळेंचा यावेळी निषेध करुन येणार्‍या काऴात हे आंदोलन तीव्र करण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close