सी.जी.टी. एक्स्पोचं मुंबईत ऍनिमेशन सेमिनार

May 12, 2009 4:02 PM0 commentsViews: 9

12 मे, ऍनिमेशन इंडस्ट्रीत सध्या बरेच बदल घडताना आपल्याला दिसताहेत. गेमिंग, ग्राफिक्स आणि ऍमिमेशन मध्ये वेगवेगळे प्रयोग होताना दिसताहेत. सी. जी.टी. एक्स्पो या ऍनिमेशन ग्रुपतर्फे येत्या 23 आणि 24 मे ला मुंबईत ऍनिमेशन सेमिनार भरवण्यात येणार आहे.सी.जी.टी. एस्पो या ऍनिमेशन सेमिनारमुळे सामान्य मुलांना एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे. मात्र ऍनिमेशन इंडस्ट्रीची वेगाने वाढ होत असतानाही सरकारक़डून मात्र या इंडस्ट्रीला म्हणावा तसा पाठिंबा मिळत नाही. यावेळी बिझनेस सोल्युशन्सचे मुख्य प्रोफेशनल प्रसाद फडके यांनी सेमिनारची माहिती दिली. या सेमिनारमध्ये 'द हण्ट फॉर गोलम' हा 3 मे 2009 ला अख्या जगभरात इंटरनेटवरुन रिलीज झालेला सिनेमा दाखवण्यात येणार आहे. ऍनिमेशन आणि स्पेशल इफेक्टस्‌चा वापर केलेला हा चाळीस मिनीटांचा सिनेमा 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' या सिनेमावर आधारित आहे. यावेळी प्राईम फोकस वर्ल्डचे उपाध्यक्ष एझाझ रशिद यांनी आजच्या आघाडीच्या प्रत्येक बॉलीवुड सिनेमामध्ये ऍनिमेशन आणि स्पेशल इफेक्टस् असताता हे सांगताना गझनी सिनेमाचं उदाहरण दिलं. त्यासोबतच 'लिटिल कृष्णा' ही संपूर्णपणे भारतात तयार झालेली ऍनिमेटेड मालिकाही दाखवण्यात येणार आहे. निक या बच्चे कंपनीच्या आवडत्या चॅनलवर ही मालिका दररोज संध्याकाळी 6 वाजता पाहता येईल. अशा प्रकारचे सेमिनार आयोजित केले आणि त्याच्या जोडीला इंडस्ट्रीतले उस्ताद असतील तर भारतातही ऍनिमेशन आणि स्पेशल इफेस्टस् असलेले प्रोजेक्ट सहज बनू शकतील.

close