मोदीजी, महाराष्ट्र हा नंबर वनच -मुख्यमंत्री

August 16, 2014 3:43 PM0 commentsViews: 10284

cm on modi16 ऑगस्ट : महाराष्ट्र आज औद्योगिक, गुंतवणूक, रोजगार, उत्पादन या क्षेत्रात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे असा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर उपस्थितीत होते. तसंच आम्ही आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत खास करुन मुंबईला आधुनिक दर्जा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत यासाठी तुमची आणि केंद्रीय मंत्र्यांची आम्हाला साथ हवी आहे असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

रायगड इथं उरणमध्ये जेएनपीटीच्या सेझ प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमात मुखमंत्री बोलत होते. विशेष म्हणजे उद्योग गुंतवणुकीत गुजरात अग्रस्थानी असल्याचा भाजपनं दावा केला होता. लोकसभेच्या प्रचारात महाराष्ट्र आणि गुजरात मॉडेलवरून वादही झाले होते. आज खुद्द मोदी आणि मुख्यमंत्री आमनेसामने झाले यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र नंबर वन असल्याचा दावा केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close