बंगलोरची फाईट कोलकाताशी तर मुंबई इंडियन्सची पंजाबशी

May 12, 2009 4:35 PM0 commentsViews: 2

12 मे,आयपीएलमध्ये आज दोन मॅच होणार आहेत. यातली पहिली मॅच आहे ती पॉईंटटेबलमध्ये सातव्या क्रमांकावर असलेल्या बंगलोर रॉयल चॅलेंजर्स आणि आठव्या क्रमांकावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सदरम्यान. सेंच्युरीअनमध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4:30 ही मॅच होईल.तर दुसरी मॅच असेल ती मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज इलेव्हन दरम्यान. पॉईंटटेबलमध्ये आघाडी घेण्यासाठी दोन्ही टीमसाठी ही मॅच जिंकणं महत्वाचं ठरणार आहे. ही मॅचसुद्धा सेंच्युरीअनमध्ये खेळवली जाईल. ती भारतीय वेळेनुसार रात्री 8 वा होईल.

close