इंजिनिअरिंग आणि मेडिकल सीईटी : अडीच लाख विद्यार्थ्यांची कसोटी

May 12, 2009 4:56 PM0 commentsViews: 1

12 मे,यावर्षी इंजिनिअरिंग आणि मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी आज मंगळवारी घेण्यात आली असून 647 परीक्षा केंद्रांवर राज्यातील अडीच लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते.सीईटीच्या प्रवेशपत्रिकेत गोंधळ झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी सर्व विद्यार्थी परिक्षा देऊ शकतील असं प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलं होतं. राज्यात 58 मेडिकल कॉलेजेस आहेत. त्यात 3.785 जागा आहेत. इंजिनिअरिंगची 221 कॉलेजेस आहेत. यात एकूण 71 हजार 785 जागा उपलब्ध आहेत.फार्मसीची 131 कॉलेज असून यात 7.675 जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे.

close