निलेश राणे जाधवांच्या विरोधात अपक्ष म्हणून लढणार

August 16, 2014 8:39 PM0 commentsViews: 3734

rane vs jadhav16 ऑगस्ट : काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचे चिंरजिव निलेश राणे लोकसभेत पराभूत झाल्यानंतर आता विधानसभेच्या आखाड्यात उडी घेतली आहे.

निलेश राणे आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री भास्कर जाधव यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गुहागर इथून ते अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवतील अशी घोषणा निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन केलीये.

यावेळी त्यांनी भास्कर जाधवांवर सडकून टीका केलीय. निवडणुकीत जाधवांनी आघाडीधर्म पाळला नाही. त्यांना जी पैशाची मस्ती चढलीय ती उतरवणार असं दंड राणे यांनी थोपडले आहे. यावरून पुन्हा एकदा राणे आणि जाधव वाद पेटणार हे दिसून येतंय.

विशेष म्हणजे नारायण राणे यांची विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचारसमितीच्या प्रमुखपदी निवड झाली आहे. नितेश राणेंच्या तिकीटावरुन वाद सुरू असताना निलेश राणे यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असं जाहीर केलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close