चक्क पाण्याचं एटीएम !

August 17, 2014 12:22 PM1 commentViews: 3223

17 ऑगस्ट : मशीनद्वारे पिण्याचं स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवण्याचा अभिनव प्रयोग अहमदनगर जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते साकुरी गावात या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. नगरसारख्या कोरडवाहू जिल्ह्यात हंडाभर पाण्यासाठी मैल न मैल पायपीट करावी लागते. त्यातूनही दूषित पाण्यातून होणार्‍या रोगराईचा सामना करावा लागतो. या प्रश्नांवर उपाय म्हणून साकुरीच्या ग्रामपंचायतीने ही कल्पना लढवली आहे. या मशिनद्वारे 1 रुपयात 5 लिटर शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचे पाणी गावकर्‍यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पिण्याचं स्वच्छ आणि शुद्ध पाणी मशीनद्वारे पुरवण्याचा राज्यातला हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. साकुरी गावातील ही प्रायोगिक तत्त्वावरची योजना यशस्वी झाल्यास ती राज्यभर राबवण्यात येणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Akshay Gaikwad

    its SAKUR not SAKURI

close