आता बाप्पांची करा ऑनलाईन बुकिंग

August 17, 2014 2:13 PM0 commentsViews: 545

Bolinjkar-Ganpati-Murti-Karkhana-Thane- 01117 ऑगस्ट :  गणपती उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाप्पांच्या मूर्तींची बुकिंग जोरात सुरू आहे. अंबरनाथमधला आयटीचा विद्यार्थी आशुतोष तिवारीने मात्र शाडूच्या इकोफ्रेंडली गणेश मूर्तींच्या ऑनलाईन बुकिंग बरोबरच मूर्तींची फ्री होम डिलिव्हरी देण्याचा एक आगळावेगळा प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे त्याच्या या प्रयत्नांना मुंबई आणि उपनगरांमधून चांगला प्रतिसाद मिळतोय.

सध्या प्रत्येक सणाला तंत्रज्ञान आणि इव्हेन्ट मॅनेजमेंट टच येत आहे. गणेशोत्सवातही यात मागे नाही, अंबरनाथ शहरातील 25 वर्षांचा आयटीचा विद्यार्थी आशुतोष तिवारीने शाडूच्या इकोफ्रेण्डली गणेश मूर्तींची ऑनलाईन बुकिंग बरोबरच मूर्तींची फ्री होम डिलिव्हरी असल्याने ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ या शहरातून अनेकांनी मूर्ती बुक केल्या आहेत. या क्षेत्रात आशुतोषचं हे पहिलं वर्ष असल्याने सुरुवात म्हणून त्याने 250 शाडूच्या गणेश मूर्ती बनवल्या आहेत. आयटी क्षेत्रातील बड्या पगाराच्या नोकरीला रामराम ठोकत त्याने हा उपक्रम हाती घेतला आहे.

धावपळीच्या आयुष्यात अनेकांना वेळेअभावी तर काहींची मुलं परदेशी असल्याने घरातल्या वरिष्ठ मंडळीची इच्छा असूनही घरी गणपतीची मूर्ती आणणं शक्य होत नाही, अशांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close