राज ठाकरे यांना सुप्रिम कोर्टाचा दणका

May 12, 2009 5:02 PM0 commentsViews: 3

12 मे,झारखंडमधल्या खटल्यांना स्थगिती द्यायला सुप्रिम कोर्टाने नकार देऊन राज ठाकरे यांना चांगलाच दणका दिला आहे. राज ठाकरे यांनी सुप्रिम कोर्टात झारखंडमधले खटले ट्रास्नफर करण्यासाठी अर्ज केला आहे. ट्रास्नफर अर्जावर सुनावणी होत नाही तोपर्यत झारखंडमधल्या खटल्यांना स्थगिती द्यावी अशा आशयाची याचिका, राज ठाकरे यांनी केली होती. पण सुप्रिम कोर्टाने ही याचिका फेटाळली असून जोपर्यंत ट्रास्नफर अर्ज कोर्टासमोर येत नाही तोपर्यत खटले झारखंडमध्येच चालू राहतील, असा निर्णय सुप्रिम कोर्टाने दिला आहे.

close