इंग्लंडने फोडली विजयाची हंडी, भारताने मालिका गमावली

August 18, 2014 10:37 AM0 commentsViews: 543

_76997945_england_ap2
18 ऑगस्ट :  भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाचव्या आणि अंतिम टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियानं पुन्हा एकदा लाजिरवाणा खेळ केला. या मॅचमध्ये इंग्लंडनं भारतावर दणदणीत विजय मिळवला आहे. इंग्लंडने पाचव्या टेस्टच्या तिसर्‍या दिवशीच 1 इनिंग्ज आणि 244 रन्सनं ही मॅच जिंकली आहे. आजच्या पराभवामुळे टीम इंडिया 5 टेस्टची सीरिज 3-1नं हरली आहे.

यजमान इंग्लंडने पहिल्या डावात 486 रन्सचा डोंगर उभा केला. या मालिकेत पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती, दुसरी टेस्ट भारताने जिंकली होती, पण त्यानंतर सलग 3 टेस्टमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला.या संपूर्ण सीरिजमध्ये कोणाचाही प्रभाव पडला नाही आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close