पोस्टमनपदाच्या चुकीच्या जाहिरातीविरोधात मनसेचं निवेदन

May 12, 2009 5:12 PM0 commentsViews: 1

12 मे, मुंबईमुंबई, ठाणे आणि नवी मुंबई विभागाच्या पोस्टमनदासाठी भरतीची जाहिरात चुकीच्या पद्धतीने आणि राष्ट्रीय पातळीवर दिल्याबद्दल मनसेनं एक निवेदन मुख्य पोस्टमास्टर जनरल एम.एस.बाली यांना दिलं आहे. एकूण 300 जागांसाठी देण्यात आलेल्या या जाहिरातीमुळे 70 हजार अर्जदारांनी नोकरीसाठी अर्ज केलेत. तसंच यातील जवळजवळ 50 हजार अर्ज महाराष्ट्राबाहेरून आल्यानं स्थानिकांना नोकरीत प्राधान्य मिळणार नाही असं मनसेनं निवेदनात म्हटलं आहे. या पदांसाठीची जाहिरात मराठी वर्तमानपत्रांत इंग्रजीत का देण्यात आली तसंच या पदासाठी स्थानिक भाषेचं ज्ञान जरुरी असल्याची अट का शिथील करण्यात आली हे दोन प्रश्नही मनसेनं निवेदनात मांडलेत. येत्या तीन दिवसात आधी दिलेली जाहिरात रद्द करावी आणि योग्य ते बदल करून नविन जाहिरात द्यावी अशी मागणी मनसेनं पोस्टमास्टर जनरलांकडे केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही मनसेनं दिला आहे. मनसेनं हा पवित्रा घेतला असला तरीही आपली जाहिरात योग्य असून ती मागे घेतली जाणार नाही असं मुख्य पोस्टमास्टर जनरल एम. एस. बाली. यांनी म्हटलं आहे.

close