कुमारस्वामींनी घेतली सोनियांची भेट

May 12, 2009 5:15 PM0 commentsViews: 1

12 मेतिसर्‍या आघाडीचे समन्वयक एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र कुमारस्वामी यांनी आज सोनिया गांधींची भेट घेतली. त्यामुळे तिस-या आघाडीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. तेलंगणा राष्ट्र समिती एनडीएत गेल्यानंतर धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या सोनिया भेटीनं तिसर्‍या आघाडीला बसलेला हा आणखी एक धक्का म्हणावं लागेल. यामुळे निवडणुकीनंतर काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्यात आघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भेटीनंतर कुमारस्वामी यांनी पत्रकारांना भेटणं टाळलं. विशेष म्हणजे या भेटीच्या तासाभरापूर्वीच धर्मनिरपेक्ष जनता दलाने एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं. आणि आपण तिसर्‍या पक्षाबरोबरच असल्याचं म्हटलं होतं.

close