मुंबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने गोविंदाचा मृत्यू

August 18, 2014 6:13 PM0 commentsViews: 2403

54mumbai dahi handi 201418 ऑगस्ट : मुंबईत सर्वत्र दहीहंडी उत्सव शिगेला पोहचला आहे. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदापथक थरावर थर लावत आहे. मात्र आतापर्यंत थरावरुन कोसळल्यामुळे जखमी गोविंदाची संख्या 99 वर पोहचली आहे. 1 गोविंदा गंभीर जखमी आहे.
तर ठाण्यामध्ये साईसदन गोविंदा पथक लालबाग येथील राजेंद्र आंबेकर (46) या गोविंदांचा मृत्यू झालाय. तर ठाण्यामध्ये साईसदन गोविंदा पथक लालबाग येथील राजेंद्र आंबेकर या गोविंदांचा मृत्यू झालाय.

राजेंद्र आंबेकर वय 46 हे नाचताना अचानक खाली पडले. उपचारार्थ ठाणे शासकीय हॉस्पिटल दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहिहंडी जवळ नाचताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं.

गोविंदांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता सुप्रीम कोर्टाने 18 वर्षाखाली गोविंदांना बंदी घातली आहे. मात्र थराचा थर लावत असताना गोविंदाचा उत्साह अपघाताला कारणीभूत ठरत आहे.

================================================================================

दहीहंडीचे व्हिडिओ पाहण्यासाठी समोरील लिंकवर क्लिक करा – http://www.ibnlokmat.tv/archives/category/video


दहीहंडीचे फोटो पाहण्यासाठी समोरील लिंकवर क्लिक करा -http://www.ibnlokmat.tv/archives/category/photo-gallery

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close