शेवटच्या टप्प्यात आतापर्यंत सरासरी दहा टक्के मतदान

May 13, 2009 6:28 AM0 commentsViews: 2

13 मे, लोकसभा निवडणुकीचा क्लायमॅक्स आता सुरू झालाय. आज पाचव्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यातलं मतदान शांततेत सुरू आहे. सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे मतदान होतंय. सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली असून मतदान केंद्रावर आता गर्दी वाढू लागली आहे. आतापर्यंत सरासरी दहा टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.जम्मू काश्मिरमध्ये मतदान होतंय. तर चेन्नईमध्येही मतदान सुरू आहे. चंदीगडमध्येही एका जागेसाठी मतदान होतंय. सकाळपासून पॉण्डिचेरीमध्ये साडे पाच टक्के, चंदीगडमध्ये बारा टक्के, पंजाबमध्ये आठ टक्के, उत्तराखंडमध्ये नऊ टक्के, पश्चिम बंगालमध्ये पंधरा टक्के, तामिळनाडूत बारा टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये साडे सात टक्के, हिमाचल प्रदेशमध्ये नऊ टक्के मतदान झालं आहे.

close