पंतप्रधानपदासाठी डाव्यांचा डॉ. मनमोहनसिंग यांना विरोध

May 13, 2009 9:36 AM0 commentsViews: 58

13 मे, अणुकराराच्या मुद्यापासून मनमोहनसिंगांचं पाठबळ काढून घेणारे डावे आजही त्यांच्याविरोधात वक्तव्य करताहेत. पंधराव्या लोकसभेत जर मनमोहनसिंग काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, तर त्यांना डाव्यांचा कधीही पाठिंबा मिळणार नाही, असा होरा डाव्या आघाडीच्या नेत्यांनी लावलाय.अणुकराराच्या मुद्यापासून मनमोहनसिंगांचं पाठबळ काढून घेणारे डावे आजही त्यांच्याविरोधात वक्तव्य करताहेत. पंधराव्या लोकसभेत जर मनमोहनसिंग काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, तर त्यांना डाव्यांचा कधीही पाठिंबा मिळणार नाही, असा होरा डाव्या आघाडीच्या नेत्यांनी लावलाय.अणुकराराच्यावेळी सरकारच्या विश्वासदर्शक ठराव झाला तेव्हा डाव्यांच्या विचारांना लोकसभा सभापती सोमनाथ चटर्जी यांनी छेद दिला होता. त्यांनी सरकारची बाजू लावून धरली होती. पण आज मतदान केल्यानंतर मात्र लोकसभा सभापती सोमनाथ चटर्जी यांनी डाव्यांच्या बाजूनं वक्तव्य करत निकालानंतर त्यांची भूमिका महत्त्वाची राहील, असं विधान केलंय.निकालापूर्वी डाव्यांचा काँग्रेसच्या धोरणांना होणारा विरोध आता निकाल लागल्यानंतर किती काळ टिकतो, हे पाहणंच महत्त्वाचं ठरेल.

close