आरटीओ बंद होणार, नितीन गडकरींचे संकेत

August 19, 2014 1:08 PM3 commentsViews: 7575

044513nitin_gadkari

19 ऑगस्ट :  केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक प्रणालीत महत्त्वाचे बदल करण्याचे संकेत दिलेत. ‘प्रादेशिक वाहतूक कार्यालये अर्थात, आरटीओ, हे कालबाह्य झालं आहे त्यामुळे आरटीओला बंद करण्याची वेळ आली आहे. आरटीओ ऐवजी दुसरी प्रभावी सिस्टीम सुरू करण्यात येईल’, असे संकेत नितीन गडकरी यांनी दिले आहेत. ते पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलत होते. आरटीओमध्ये फक्त लक्ष्मीदर्शनाचा खेळ चालतो, अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, एकीकडे शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे लक्ष्मीचे पुजन करायचे हे धोरण राज्यात सुरू असल्याची जळजळीत टीका सार्वजनिक बांधकाम आणि सिंचन खात्याला उद्देशून त्यांनी केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sushant Jadhav

    Awesome decision. Such old and corrupted systems must be removed and online, centralized, transparent systems should be started. Hope we will see it in next few months.

  • mahendra

    Yes. This existing RTO has to be scrap. But how new system will ensure non corruption. These laxmi poojak will find a wayout to do corruption.

  • http://batman-news.com vijay khati

    Yes agreed with you. RTO office is a main source of income and shed prepared by government for agen’s only.

close