पोलिसांकडूनच कोर्टाच्या निर्देशांना हरताळ, बालगोविंदांचा केला सत्कार

August 19, 2014 5:43 PM0 commentsViews: 666

bhivandi19 ऑगस्ट : दहीहंडी उत्सव जल्लोषात पार पडला पण गोविंदांकडून कोर्टाचे आदेश मात्र पायदळी तुडवले गेल्याचे प्रकारही घडले. पण त्यात भरात भर म्हणजे भिवंडीत पोलिसांनीच सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांना हरताळ फासलं. युवाशक्ती मंडळाच्या हंडीत पोलिसांकडूनच बालगोविंदांचा सत्कार करण्यात आला. भोईवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांनीच आपल्या हाताने बालगोविंदांना बक्षीस वाटप केलंय.

भिवंडी शहरातील भंडारी कम्पाउंडमधील युवाशक्ती मंडळाने आयोजित केलेल्या दहीहंडीमध्ये 12 वर्षांखालील गोविंदांचा समावेश होता. या गोविंदांचा भोईवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली. तर पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे आणि पोलीस सहाय्यक आयुक्त रवींद्र भोसले यांच्या उपस्थितही खासदार कपिल पाटील, महापौर प्रतिभा पाटील आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनिता टावरे यांच्या हस्ते 12 वर्षाखालील गोविंदाचा सत्कार करून त्यांना बक्षिसे देण्यात आलीय. हाच प्रकार सर्व शहरात पहावयास मिळत होता. कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे 12 वर्षांखालील गोविंदांच्या दहीहंडीतील सहभागावर बंदी होती. आता अशा गोविंदा पथकांवर पोलीस गुन्हे दाखल करतात का याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. अजूनपर्यंत अशा प्रकारचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close