‘उपोषण’वासातून इरोम शर्मिलांची 2 दिवसांत सुटका

August 19, 2014 6:41 PM0 commentsViews: 1481

irom sharmila319 ऑगस्ट : तब्बल 14 वर्ष उपोषण करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांची अखेर सुटका होणार आहे. लष्कराच्या विशेषाधिकार कायद्याविरोधात गेल्या 14 वर्षांपासून इरोम शर्मिला यांनी लढा देत आहे.

त्यांच्या लढ्याची दखल घेत मणिपूर कोर्टाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. ‘आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सबळ पुरावे नाहीत’ असं म्हणत मणिपूर कोर्टाने इरोम शर्मिला यांना सोडण्याचे आदेश दिले. त्यांची दोन दिवसात सुटका होईल.

इरोम शर्मिला सध्या स्थानबद्ध आहेत. 14 वर्षांपासून इरोम शर्मिला यांचा लढा सुरू आहे. 2 नोव्हेंबर 2000 रोजी लष्कराला विशेषाधिकार देणारा आणि आर्म्ड फोर्सेस स्पेशन पॉवर्स ऍक्ट रद्द करावा यासाठी इरोम यांनी उपोषणाला सुरुवात केली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close