मराठवाड्यात 2 दिवसात 4 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

August 19, 2014 8:54 PM0 commentsViews: 453

farmmer19 ऑगस्ट : पावसाने पाठ फिरवल्यामुळे महाराष्ट्र सरकरानं दुष्काळ सदृश्यं परिस्थिती जाहीर करून आठवडा उलटला नाही. मात्र मराठवाड्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं सत्र काही थांबेना…गारपिटीनंतरही राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं सुरू आहे.

आतापर्यंत आत्महत्येचा आकडा हा 241 वर पोहचला आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये मराठवाड्यात पावसाने दडी मारल्यामुळे चार शेतकर्‍यांनी आपल्या गळ्याला फास लावून घेतलाय. बीड जिल्ह्यातील जीवनराज हंगे यांनी मुलीचा साखरपुडा आठवड्यावर असतांना आत्महत्या केली.

तर परभणीच्या प्रभाकर घुगे यांनीही दोनदा सोयबीन पेरणी करूनही हाती काही आलं नाही म्हणून जीवन संपवलं. हिंगोलीच्या उमराव कुंटे यांनी पेरणीला घेतलेलं कर्ज कसं फेडायच्या या चिंतेत फास लावून घेतला. गारपिटीनंतरही आतापर्यंत 241 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. यामध्ये बीडमध्ये सर्वाधिक 69 शेतकर्‍यांनी आपलं जीवन संपवलंय. त्याखालोखाल नांदेडमध्ये 47 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर मराठवाड्याची राजधानी समजल्या जाणार्‍या औरंगाबादमध्ये 28 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे.

गारपिटीनंतर 241 आत्महत्या
जिल्ह्यानुसार आकडेवारी

  • बीड – 69
  • नांदेड – 47
  • औरंगाबाद – 28
  • उस्मानाबाद – 34
  • लातूर 20
  • परभणी – 21
  • जालना – 11
  • हिंगोली – 11

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close