पोलिसांकडे तक्रारीसाठी ‘ती’ची 9 तास वणवण !

August 19, 2014 9:05 PM0 commentsViews: 1703

Rape case219 ऑगस्ट : अवघी मुंबई दहीहंडी उत्सवात बुडाली असताना एका तरुणीला मात्र भयानक प्रसंगाला सामोरं जावं लागलं. मुंबईमधील वांद्रे इथं एक तरुणी आपल्या मित्राबरोबर फिरायला गेली होती. तेव्हा काही गुंडांनी तिचा विनयभंग केला.

त्यानंतर तिनं पोलिसांकडून मदत मागितली. ही मदत मिळाली, पण त्यासाठी तिला तब्बल 9 तास वणवण करावी लागली. धारावी, शाहूनगर, वांद्रे इथल्या पोलीस स्टेशनकडे तिनं मदत मागितली.

पण तातडीने तक्रार नोंदवून घेण्याऐवजी पोलिसांनी मलाच असंवेदनशीलपणे उलटसुलट प्रश्न विचारले, असा आरोप तिने केलाय. अखेर बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये तिची तक्रार नोंदवून घेण्यात आली. मात्र आपण टाळाटाळ केल्याचा आरोप पोलिसांनी फेटाळला आहे. याबद्दल आता पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. कोणत्या अधिकार्‍यांनी तक्रार लिहून घ्यायला टाळाटाळ केली, त्याची चौकशी करण्याचे आदेश मारियांनी दिले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close