अशी आहे नागपूरची मेट्रो !

August 19, 2014 11:15 PM0 commentsViews: 1692

nagpur metro photo 201419 ऑगस्ट: देशाची उपराजधानी नागपूर लवकरच मेट्रो’भरारी’ घेणार आहे. नागपूरमध्ये मेट्रो प्रोजेक्टचं भूमिपूजन 21 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पण दिल्ली आणि मुंबईनंतर नागपुरकरांची मेट्रो कशी असणार आहे याची उत्सुकता सर्वांना लागून आहे. नागपूर मेट्रोचं ऍनिमेटेड प्रेझेंटेशन सुधार प्रन्यासाने तयार केलंय. या मेट्रो’राणी’चा हा खास ऍनिमेटेड व्हिडिओ आयबीएन लोकमतच्या हाती लागलाय.

या मेट्रोमध्ये 38 किलोमीटर्सचे दोन कॉरिडॉर्स असतील. कामडी रोड परिसर ते मिहान आणि पारडी ते हिंगणा लोकमान्यनगर असा प्रवास या मेट्रोचा असणार आहे. दोन्ही मार्गावर अनुक्रमे 17 स्टेशन तर दुसर्‍या मार्गावर 19 स्टेशन असणार आहे.

या प्रकल्पासाठी 6,862 कोटी रुपये खर्च येणार असून 20 टक्के केंद्र सरकार, 20 टक्के राज्य सरकार, 5 टक्के नागपूर महानगर पालिका, 5 टक्के नागपूर इन्प्रुव्हमेंट ट्रस्ट म्हणजेच एनआयटी आणि 50 टक्के खाजगी कंपन्यांकडून उभारले जाणार आहेत.

साडेपाच वर्षांत हा प्रकल्प उभारला जाईल. या प्रकल्पासाठी फक्त सहा टक्के जागा खाजगी लोकांकडून घ्यावी लागणार असल्यामुळे जमीन अधिग्रहणाची अडचण येणार नसल्याचं एनआयटीने सांगितलंय.

अशी आहे नागपूरची मेट्रो

- 38 किलोमीटर्सचे दोन कॉरिडॉर्स
– नॉर्थ – साऊथ कॉरिडॉर
– कामडी रोड परिसर ते मिहान
– एकूण 19 किलोमीटर
– 17 स्टेशन्स
– ईस्ट – वेस्ट कॉरिडॉर
– पारडी ते हिंगणा लोकमान्य नगर
– एकूण 18 किलोमीटर
– 19 स्टेशन्स

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close