अखेर ‘त्या’ नरभक्षी वाघाचा खात्मा

August 20, 2014 8:42 AM0 commentsViews: 1061

tiger
20  ऑगस्ट :  चंद्रपूर जिल्ह्यात 7 जणांचे बळी घेणार्‍या नरभक्षक वाघाला अखेर ठार करण्यात आलं. पोंभुर्णा तालुक्यातल्या डोंगर-हळदी गावालगतच्या जंगलात वनविभागाच्या शार्प शूटर्सनी या वाघाला ठार केलं. गेल्या 3 महिन्यांपासून या भागात नरभक्षक वाघाची दहशत होती.

नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वनविभागानं गेल्या अनेक दिवसांपासून सापळा रचला होता. यासाठी या भागात पिंजरे लावण्यात आले होते आणि चार शार्प शूटर्सही तैनात करण्यात आले होते. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी कालपासून हा सगळा भाग पिंजून काढला होता.

अखेर काल संध्याकाळी सातच्या सुमाराला हा वाघ दिसल्यावर शार्प शूटर्सनी वाघावर 10 पेक्षा अधिक राउंड फायर करून वाघाला ठार केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close