‘डॉ.दाभोलकरांच्या खुनाचा CBI तपास कोर्टाच्या देखरेखीखाली व्हावा’

August 20, 2014 10:58 AM0 commentsViews: 331

dabhokar family

20  ऑगस्ट : डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आज एक वर्ष पूर्ण झालं. डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा तपास सीबीआयकडे जरी सोपवला असला तरीही मारेकर्‍यांच्या सुगावा लागू शकलेला नाही.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. पण सीबीआयचा तपास हा कोर्टाच्या देखरेखीखाली व्हावा अशी मागणी दाभोलकर कुटुंबीय करत आहेत. सीबीआयच्या तपासावर पूर्ण विश्वास ठेऊन निर्धास्त राहता येणार नाही, असं दाभोलकर कुटुंबीयांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं.

वर्षभरानंतरही मारेकरी पकडण्यात सरकारला अपयश आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी अंनिसचे राज्यभरातले कार्यकर्ते आज पुण्यातल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर जमले होते. वर्षभरापूर्वी याच पुलावर दाभोलकरांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. दाभोलकरांना आदरांजली वाहण्यासाठी पुलावर चळवळीची गाणी गाऊन निषेध आंदोलन करण्यात आलं. यानंतर हे कार्यकर्ते फुले वाड्याकडे निघाले. या आंदोलनात नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक, सोनाली कुलकर्णी यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेते सहभागी झाले आहेत.

वर्षभरानंतरही मारेकरी पकडण्यात सरकारला अपयश आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. दाभोलकरांचा खून झाल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचे समर्थक हा निषेध व्यक्त करत आहेत पण सरकार मात्र आश्वासानापलिकडे काहीच देऊ शकली नाही. मुंबईतही दाभोलकरांचे मारेकरी न सापडल्याचा निषेधार्थ आज संध्याकाळी ‘धिक्कार रॅली’ काढण्यात येणार आहे. दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत अभिवादन सभा होणार असून संध्याकाळी 5 वाजता दादरच्या वीर कोतवाल उद्यानापासून चैत्यभूमीपर्यंत धिक्कार रॅली काढण्यात येईल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close