शेवटच्या टप्प्यात 62 आणि सर्व टप्प्यात 60 टक्के मतदान

May 13, 2009 5:31 PM0 commentsViews: 2

13 मे पंधराव्या लोकसभेसाठीच्या सर्व टप्प्यांचं मतदान आज संपलं. शेवटच्या टप्प्यात सरासरी 62 टक्के मतदान झालं. तर सर्व टप्प्यात एकूण 60 टक्के मतदान झालं. शेवटच्या टप्प्यात 7 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान झालं. यात तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन महत्त्वाच्या राज्यांचा समावेश होता. तामिळनाडूमध्ये पाचव्या टप्प्यात सर्वच जागांसाठी मतदान झालं. तर उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये सर्व टप्प्यात मतदान झालं. शेवटच्या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, ममता बॅनर्जी, वरुण गांधी, मनेका गांधी, जयाप्रदा, मणिशंकर अय्यर आणि क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन यांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं. आजमतदानात निवडणुकीतले उमेदवार दयानिधी मारन यांनी मतदान केलं. तर वरुण गांधी दिवसभर पिलिभीतमध्ये मतदान केंद्रांना भेट देत होते. तर निवडणूक रिंगणात असलेले दोन क्रिकेटर्स मोहम्मद अझरुद्दीन आणि सिद्धू यांनीही आज मतदान केलं. 16 एप्रिलला सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आज संपल्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष 16 मेपासून सुरू होणा-या मतमोजणीकडे लागलं आहे. पाचव्या टप्प्यात नऊ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये सरासरी 62.टक्के मतदान झालं. मतदानाची राज्यवार टक्केवारी अशी – तामिळनाडू – 62% ( 39 जागा )पश्चिम बंगाल – 70 % ( 11 जागा )पंजाब – 65% ( 9 जागा)उत्तर प्रदेश – 52% ( 14 जागा )उत्तराखंड – 55 % ( 5 जागा)हिमाचल प्रदेश – 55 % ( 4 जागा)जम्मू आणि काश्मीर – 45% ( 2 जागा)चंदीगड – 65 % ( 1 जागा )पाँडिचेरी – 75 % ( 1 जागा )

close